संयुक्त जयंती साजरी करावी (सम्राट अशोक, फुले ११ एप्रिल, बाबासाहेब १४ एप्रिल)
वर्गणी नम्रपणे मागावी (स्वाभिमानी पद्धतीने)
वर्गणीचा उपयोग प्रामाणिक व योग्य गोष्टींसाठी करावा
वर्गणीच्या प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवावा; बोर्डवर दाखवावा
कार्यक्रमात जनजागृती व प्रबोधनाला महत्त्व असावे
“आदर्श विहारास” सर्वाधिक गुण मिळतील
विहार छोटे असले तरी स्वच्छ असावे
प्रत्येक रविवारी प्रवचन असावे; लाउड-स्पीकरवर सर्व वस्तीला ऐकवावे
विहारासमोर नोटीस बोर्ड असावा; त्यावर रोज एक सुविचार असावा
विहारात पुस्तकांचे कपाट व विहाराबाहेर वृत्तपत्र वाचनालय असावे
विहारासमोर मुलांसाठी अभ्यासासाठी बेंच असावेत
गुटखा, तंबाखू, दारू व इतर व्यसनाधीन गोष्टी विहाराच्या आसपास आणू नयेत
‘२२ प्रतिज्ञा’ व ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ पुस्तकांचा वाचन वर्ग सुरू करावा
विहारासमोर रांगोळी काढावी
गोड पदार्थ शेजारी-पाजारी वाटावेत
जयंतीमध्ये सामाजिक/धम्माचे काम करणाऱ्या प्रत्येक छोट्या कार्यकर्त्याचे कौतुक-अभिनंदन करावे
मुलांना प्रोत्साहनासाठी स्पर्धा घडवून आणाव्या व बक्षीस ठेवावे
व्यसनमुक्ती, जात-भेदभाव निर्मूलनाच्या शपथा घ्याव्या
बुद्ध-धम्म-पालनाचे वचन प्रत्येक कुटुंबाने एकमेकांना द्यावे
आनंद, मैत्री व गोड वातावरण सर्व समाजात राहावे, यासाठी प्रयत्नशील असावे
धर्मांध व लोकशाही-विघातक प्रवृत्ती लांब ठेवाव्यात
बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थांचे सभासद व्हा व व्हा:
• The Buddhist Society of India
• Samata Sainik Dal
• Republic Party Of India
—
🥇 प्रथम पारितोषिक: शिक्षण आणि नैतिक, सांस्कृतिक मूल्यांनी श्रीमंत असलेली वस्ती/समाज.
🥈 द्वितीय पारितोषिक: पुढची पिढी निर्व्यसनी, सुदृढ, हुशार आणि आनंदी होईल.
🥉 तृतीय पारितोषिक: जात-पात, भेदभावमुक्त वर्तणूक सर्वांसाठी; मैत्री आणि बंधुता सर्व माणसात निर्माण होईल.
आणि इतर अनेक लाखो-कोटो बक्षिसे!
—
💡 भीमजयंती: नुसता उत्सव नको, परिवर्तनाचा संगर व्हावा!
दरवर्षी महामानवाची जयंती प्रचंड उत्साहात केली जाते. मोठे मंडप, शहनाई, मिरवणुका, डीजे-डॉल्बी, जेवणावळी...
परंतु यावेळी आंबेडकरांचा नेमका विचार मागे राहतो. संविधानाला अभिप्रेत असणारा भारत घडविण्याची आंबेडकरांची मनीषा पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. आंबेडकरांचा समतेचा, शिक्षणाचा, संघर्षाचा विचार जनमानसात रुजविण्याचे मोठे काम अजूनही चालूच आहे.
या आंबेडकर जयंतीला उत्सव करण्यापेक्षा, परिवर्तनाचा संगर, जागर करण्याची नितांत गरज आहे.
—
• पारंपारिक पद्धतीला फाटा, नवे उपक्रम राबवा
• व्याख्याने व परिसंवाद
• पुस्तकांचे वाटप
• स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
• विज्ञान प्रदर्शन
• स्थलचळवळीची जाणीव
• कर्तृत्ववान महिला सत्कार
• नवीन शिष्यवृत्ती जाहीर
• अभ्यासकेंद्र / स्टडी रूम तयार करा
• पुस्तक प्रदर्शन
• बुवाबाजी, भांडाफोड यावर मार्गदर्शन
• ग्रेटभेट सारखे कार्यक्रम
• सुशिक्षित कुटुंबांचा सत्कार
• उत्कृष्ट भीमजयंतीला बक्षिसे द्या
• महिला व बालकांच्या स्पर्धा
• नेतृत्व व वक्तृत्व विकास शिबिरे
• शॉर्टफिल्म दाखवून प्रबोधन
• रिंगणनाट्य / पथनाट्य
• भीमगीतांसोबत प्रबोधनकार बोलवा
• चमत्कार सादरीकरण व अंधश्रद्धा निर्मूलन
• परिसरातील कलावंतांसाठी कलामहोत्सव
• विधवा महिला पुनर्वसन
• बुद्ध, अशोक, कबीर, तुकाराम, शिव, संभाजी, शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार मांडा
• गावातील तरुणांचे कवी संमेलन; कविता संग्रह प्रकाशित करा
• लिंगभाव भेदावर व्याख्यान
• महिला सबलीकरण व्याख्याने
• भारतीय संविधान मार्गदर्शन
—
आपण सर्वांनी मिळून परिवर्तनाचा हा संगर उभारूया! 💪🔊